जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
१३० दिवसात २७ देश व २९००० किमी चा प्रवास करताना कधीही दुःख ,भय वाटले नाही कारण मी जिकणारच या भावनेने मी प्रवास करत होतो
कोणत्याही क्षेत्रात पराभव आधी मनात होतो त्यानंतर रणात होतो प्रत्यक्षात होतो असे प्रतिपादन मुंबई ते लंडन व लंडन ते मुंबई असा मोटरसायकल प्रवास करणारे
प्रवासवीर योगेश आलेकरीं यांनी केले.
बारामती ट्रेकर्स क्लब आयोजित फिरस्तंचा मेळावा या कार्यक्रमात योगेश आलेकरीं यांनी सांगितले
बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात भटकंती ,सहल,फिरस्ते क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्तीत होते.
१३० दिवसात २७ देश व २९००० किमी चा प्रवास आलेकरी यांनी २ तासात सांगताना त्यांनी अनेक प्रवासातील किस्से सांगितले , प्रवासात असे प्रसंग आले ज्यावेळी निर्णय घेणं आवघड असत त्यावेळी मन खंबिर असेल तर आनेक गोष्टींवर मात करता येते.सह्याद्री तील लोक जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी अडचणीतून मार्ग काढतात, असे अनेक प्रसंग सांगताना त्यांनी प्रवासातील फोटो अन् व्हिडीओ ही दाखवून खरा प्रवासी कसा असतो हे दाखविले .
यावेळी बारामती ते केदारनाथ सायकलवर तसेच चालत प्रवास करणारी विलास वाघचौरे यांचा ‘ शिव सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष ॲड सचिन वाघ यांनी केले तर हरीश कुंभरकर राहुल झाडे ,योगेश वाघ या ट्रेकर्स क्लब च्या सदस्यांनी वर्ष भरा मध्ये बारामती ट्रेकर्स क्लब च्या माध्यमातून हिमालय ते रामेश्वर व बदामी , हम्पी , अजिंठा पर्यंत चां मंदिरांचा आभ्य्यास , हिमालयातील ट्रेक या प्रवासाविषयीचे वेगवेगळे अनुभव कथन केले. सूत्रसंचालन विपुल पाटील व शुभम निंबाळकर यांनी केले तर आभार प्रशांत पवार यांनी मानले
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती ट्रेकर्स क्लब च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .
फोटो ओळ : बारामती ट्रेकर्स क्लब च्या वतीने सन्मान करताना मान्यवर