आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकीचे ॲस्ट्रोटर्फ मैदान फलटण येथे निर्माण करण्यास पूर्णतः सहकार्य करणार :- श्रीमंत रामराजे

मुधोजी हायस्कुल च्या मुलींनी वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये प्राप्त केले ब्रांझ पदक

कु. अनुष्का चव्हाण, कु अनुष्का केंजळे,कु.श्रेया चव्हाण कु.निकिता वेताळ व कु.तेजस्विनी कर्वे व क्रीडा प्रशिक्षक महेश खुटाळे व सचिन धुमाळ

फलटण – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेने दि हॉकी सातारा संघटना व मुधोजी हायस्कूल च्या पाच महिला खेळाडू अनुष्का केंजळे, अनुष्का चव्हाण,श्रेया चव्हाण तेजस्विनी कर्वे, व निकिता वेताळ यांची गुजरात (सुरत) येथे झालेल्या पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा मध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेलीहोती. त्यांनी सुरत येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले .सातारा जिल्ह्याच्या तेजस्विनी कर्वे, श्रेया चव्हाण, निकिता वेताळ अनुष्का चव्हाण व अनुष्का केंजळे अशा पहिल्यांदाच पाच हॉकी खेळाडूंना महाराष्ट्रात हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे सोने करत त्यांनी उत्कृष्ट खेळ करत पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये ब्रांच पथक प्राप्त केले.
सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानचा तुरा रोवला गेल्याची माहिती दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक तथा तालुका क्रिडा अधिकारी (नि.) श्री महेश खुटाळे यांनी माहिती दिली.

सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये श्रेया चव्हाण, निकिता वेताळ, अनुष्का चव्हाण अनुष्का केंजळे तेजस्विनी कर्वे यांनी उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राच्या संघाला ब्रांच पदक प्राप्त करून दिले.

  त्यांना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे  व मधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ प्रशिक्षण देत आहेत.

   तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून श्री बीबी खुरंगे सर, सहाय्य करत आहेत.
 या पाच महिला  खेळाडूंचा सत्कार मा. विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब (महाराज साहेब) यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी प्रशिक्षक व खेळाडूंनी फलटण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे होकीचे ॲस्ट्रोटर्फ मैदान उपलब्ध व्हावे अशी विनंती महाराज साहेबांना केली.
     त्यावेळी बोलताना महाराज साहेबांनी फलटण मध्ये हॉकीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावा याकरिता  आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकीचे ॲस्ट्रोटर्फ मैदान फलटण येथे निर्माण करणे बाबत पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जेणेकरून फलटण मधील व एकूणच सातारा जिल्ह्यातील हॉकी खेळाडूंना पुणे किंवा इतर ठिकाणी टर्फ मैदानावरती सराव करण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही.
   सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा . श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री सुधीर अहीवळे 'उपप्राचार्य नितीन जगताप ,पर्यवेक्षिका सौ पूजा जोशी ,क्रीडाशिक्षक बी.बी . खुरंगे , कु . धनश्री क्षिरसागर ,डी एन जाधव , संतोष तोडकर , अमोल नाळे व  दि हॉकी सातारा  संघटनेचे अध्यक्ष श्री बाहुबली शहा, उपाध्यक्ष श्री सचिन लाळगे खजिनदार  श्री पंकज पवार सदस्य श्री प्रवीण गाडे, श्री महेंद्र जाधव माजी राष्ट्रीय खेळाडू श्री शिरीष वेलणकर,श्री सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!