फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १२ ) :-
कै. राजेंद्र जगन्नाथ साळुंखे (राजाभाऊ ) यांच्या स्मरणार्थ जेे के क्रिकेट ग्राउंड वाठार निंबाळकर फलटण येथे आर एस पी चॅम्पियन ट्रॉफी 2024 चे फलटण येथे भव्य पावसाळी फुल पीच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धेमध्ये गाव.तालुका. तसेच ओपन गटात.संपूर्ण महाराष्ट्रातील संघांनी सहभाग घेतला आहे तसेच ही स्पर्धा 7s लाईव्ह youtube चॅनलवरती दाखवण्यात येणार आहे
ही स्पर्धा शनिवार दिनांक 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष तथा अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट )मा. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे
तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये स्पर्धेचे प्रथम बक्षीसा चे प्रायोजक मा. बुवासाहेब हुंबरे (उद्योजक), जितेंद्र कुमार नाईक निंबाळकर (काका ) व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .
यावेळी या स्पर्धेसाठी नामांकित महाराष्ट्रातील पंच नामांकित समालोचक व प्रसिद्ध सेवन एस लाईव्ह चे
प्रेक्षेपण केले जाणार आहे . या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस 51 हजार
द्वितीय क्रमांकाचे 25 हजार तर
तृतीय क्रमांकाचे 11 हजार व
चतुर्थ क्रमांकाचे 7 हजार रुपये असणार असून
वैयक्तिक भरपूर बक्षीसांचा वर्षाव होणार
आहे असे अक्षय साळुंखे यांनी सांगितले .