मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण,
या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कु.आशा लता बापूराव काशीद चालूवर्षी (2024 ) झालेल्या सेट (अधिव्यख्याता) पात्रता परीक्षा इंग्रजी या विषयातून उत्तीर्ण झाले. फलटण एजुकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये गेली 19 वर्षे अध्यापनाचा अनुभव व अभ्यासातील सातत्यामुळे हे संपादन झाले. असा अनुभव त्यांनी कथन केला. सध्या ते शेती विद्यालयामध्ये कार्यरत असून, श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून पीएचडी करत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर फलटणी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे मा.सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर प्रशालाचे प्राचार्य श्री संजय वेदपाठक व प्राचार्य बाळकृष्ण काळे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या