पाच पांडव आश्रम शाळा येथे जैन सोशल ग्रुप अध्यक्षां सविता दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न !

फलटण टुडे वृत्तसेवा :-
पाच पांडव आश्रमशाळा अलगुडेवाडी येथे आज 78 वा स्वातंत्र्य दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला. जैन सोशल ग्रुप फलटण च्या अध्यक्षा सविता मिलिंद दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजस्त॔भाचे पुजन व ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दुबई येथे नोकरी करणा-या धुळदेव च्या मोनिका जमदाडे मॅडम ऊपस्थित होत्या. या वेळी जमदाडे मॅडम यांनी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व खाऊ पाकिटाचे वाटप केले.जैन सोशल ग्रुप फलटण च्या वतीने खाऊ व लेखन साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी जैन सोशल ग्रुप चे ऊपाध्यक्ष श्रीपाल जैन , सेक्रेटरी प्रितम शहा वडुजकर , खजिनदार समीर शहा, संचालक डाॅ. मिलिंद दोशी, राजेश शहा ,सचिन शहा, हर्षद गांधी , भारत फोर्ज चे महेश शेंडे, धुळदेव चे अर्जुन फरांदे संस्थेचे अध्यक्ष महादेव नाळे साहेब,संचालक संतोष नाळे , ऊपाध्यक्ष राहुल नाळे ऊपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थाना वरून भाषण करताना सविता दोशी यांनी 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!