सुनेत्रा पवार खासदार पदी निवड झाल्याबद्दल इलेक्ट्रिक बाईक व हेल्मेट वाटप
बारामती:
हॉटेल व्यवसाय करत असताना केवळ नफा न कमवता, सामाजिक बांधिलकी म्हणून वर्षभर विविध उपक्रम राबवणे आणि त्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करणे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.
शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी हॉटेल राजवाडा पार्क यांच्या वतीने सुनेत्रा पवार यांची खासदार पदी निवड झालेबद्दल इलेक्ट्रिक बाईक व हेल्मेट वितरण समारंभ सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी त्या उपस्थित यांना मार्गदर्शन करत होत्या.
या प्रसंगी,छत्रपती उद्योग समुहाचे संस्थापक व हॉटेल राजवाडा पार्क चे संचालक आनंद सावंत, छत्रपती उद्योग समूहाचे चेअरमन संजय सावंत, संचालिका सौ सोनाली आनंद सावंत व
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, सहायक मोटार निरीक्षक विशाल नाझीरकर,मोटार निरीक्षक अमृता वांढेकर , केंद्रीय राखीव पोलीस दल चे प्रवीण जगताप
रुईचे माजी सरपंच मच्छिंद्र चौधर, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष अमर घाडगे व विनोद चौधर, नवनाथ चौधर, योगेश डेरे, स्वराज सावंत आदी मान्यवर उपस्तीत होते.
हॉटेल राजवाडा पार्क ने गुणवत्ता,दर्जा देत ग्राहकांचा विश्वास जिंकला व पुणे मुंबई सारख्या सेवा व सुविधा बारामती मध्ये ग्राहकांना देत वर्षभर विविध योजना राबवित सामाजिक हित जोपासले त्यामुळे ‘संतुष्ट व समाधानी ग्राहक म्हणजे हॉटेल राजवाडा पार्क होय ही खरी ओळख निर्माण केल्याचे खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
ग्राहकांना उत्कृष्ट जेवण देताना वाहतुकीचे नियम पटवून देणे आणि ग्राहकांना हेल्मेट व वाहतूक नियम मार्गदर्शिका देऊन सन्मान केल्यामुळे हॉटेल राजवाडा पार्क ने सामाजिक वैभवात भर घातल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा विविध उपक्रम राबविले व आता खासदार पदी सुनेत्रा वहिनी यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक बांधिलकी म्हणून इलेक्ट्रिक बाईक व हेल्मेट ग्राहकांना दिले आहे व त्याच प्रमाणे
सासू व सून आणि कुटूंब जेवणास आले पाहिजे ही अट असली तर सासू सून प्रेम जेवणातून वाढावे ,संवाद वाढावा कुटूंबात गोडवा वाढावा
ही भावना असून ‘ लाडकी सून ‘ उपक्रम राबवला या उपक्रमामध्ये सासुबाईच्या जेवणावरती सुनबाई चे जेवण फ्री असून या योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे हॉटेल राजवाडा पार्कचे संचालक आनंद सावंत यांनी सांगितले.
या वेळी या उपक्रमात विजेते ठरलेले सुनील जायपत्रे यांना इलेक्ट्रिक बाइक देण्यात आली तर इतर ३० विजेत्यांना हेल्मेट देण्यात आले.
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार संजय सावंत यांनी मानले .
फोटो ओळ:
लाडकी सून उपक्रमातील विजेत्यांना दुचाकी चावी देताना खासदार सुनेत्रा पवार व आनंद सावंत, राजेंद्र केसकर