बारामती:प्रतिनिधी
रक्षा बंधन बहीण भावाचे पवित्र नाते दर्शवते त्याच प्रमाणे रक्षा बंधन मुळे धर्म व जातीच्या भिंती निघून जातात कौटुंबिक, सांस्कृतिक व सामाजिक एकोपा राहण्यास मदत होते असे प्रतिपादन शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
शरयू फाउंडेशन च्या वतीने सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त आमराई येथे ‘सामूहिक राखी पौर्णिमा ‘ साजरी केली या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष ऍड संदीप गुजर, महिला शहर अध्यक्षा आरती शेंडगे, युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, युवती अध्यक्षा प्रियंका खारतोडे, ओबीसी सेल उपाध्यक्ष रूपाली नाईक व ऍड रोहित काटे, शंकर गव्हाळे, संजय गव्हाळे निर्जला शेंडगे ,सुप्रिया शेंडगे, गायत्री आढाव,प्रिया गव्हाळे, निलेश शेडगे, इंद्रभान लव्हे, अतुल खैरे, अण्णा पाटील ,महेश रोकडे ,रवींद्र करळे, अविनाश भापकर ,तानाजी गिरंजे आदी मान्यवर उपस्तीत होते.
शरयु फौंडेशन सामाजिक, जलसंधारण, क्रीडा, आरोग्य, व्यसन मुक्ती आदी क्षेत्रात काम करत असताना विविध सण, उत्सव साजरे करताना जगातील सर्व बहीण भावाचा हक्काचा उत्सव रक्षा बंधन साजरे करून ऐक्य, प्रेम,व योगदान यांची मुक्तहस्ताने उधळण करतो व बलशाली भारताची खरी ओळख दाखवितो असल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले.
बहीण भावाचा पवित्र सण म्हणून रक्षा बंधन साजरे करून आदर्शवत सामाजिक काम शरयु फौंडेशन करत असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा आरती शेंडगे यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची गरज असल्याचे अनेक मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले.
या प्रसंगी प्रात्येनिधिक स्वरूपामध्ये लहान मुलींनी लहान भावास राखी बांधून व औक्षण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. बहीण व भाऊ यांचे प्रेम, अतूट नाते सांगणारे गाणी सादर करण्यात आली.
आभार रवींद्र कराळे यांनी मानले.
फोटो ओळ:
राखी बांधून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी शर्मिला पवार, आरती शेंडगे व इतर