बारामती: प्रतिनिधी
सहकारी दुय्यम निबंधक वर्ग २ येथील शिपाई संजय कृष्णा साबळे यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ‘लिलावर्ध
गुणवंत कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड ,पोलीस निरीक्षक संतोष घोळवे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन अधीक्षक हनुमंत पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल ,बारामती नगर परिषद चे
मुख्यधिकारी महेश रोकडे व सोशल सर्विस सेंटर चे अध्यक्ष साहिल कोठारी ,सचिव शेखर कोठारी व डॉ.उज्जवला कोठारी
इतर मान्यवर उपस्तीत होते.
सोशल सर्व्हिस सेंटर च्या वतीने दरवर्षी १मे महाराष्ट्र व कामगार दिना निमित्त सदर पुरस्कार जाहीर करण्यात येतात व व स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरस्कार देण्यात येतात.
संजय साबळे हे स्वतः अपंग व चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून,खरेदी विक्री साठी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करणे,शासनाच्या नियमांची माहिती देणे त्याच बरोबर कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शेखर कोठारी यांनी दिली.सदर पुरस्काराने जवाबदारी वाढली असून जोमाने काम करू करणार असल्याचे संजय साबळे यांनी सांगितले.
फोटो ओळ: प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना संजय साबळे