वृक्षानां राखी बांधून रक्षाबंधन साजरे..!

बारामती :
येथील रागिनी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने वृक्षानां राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
रागिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, आजही रक्षाबंधनच्या निमित्ताने देशी वृक्षानां राखी बांधून रागिनी फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

‘ देशी वृक्षांचे संवर्धन हे पुढील पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे असून देशी वृक्षांचे संगोपन करून जतन करणे महत्त्वाचे आहे. देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वृक्षांचे संवर्धन आणि जतन हे अत्यंत महत्त्वाची बाब असून प्रत्येक नागरिकांनी त्याबद्दल दक्ष असून महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी दिली.
ह्या उपक्रमासाठी ऋतुजा आगम, सुजाता लोंढे, मंगल आगम,श्रुतिका आगम,ज्योती बोधे,साक्षी आंबेकर यांचे योगदान लाभले.

फोटो ओळ: रक्षा बंधन साजरे करताना भगिनी

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!