बारामती: प्रतिनिधी बारामती शहरातील शाळा म. ए.सो. चे, कै. गजानन भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी आनंद सुरेश मोरे पाटिल यांची शिक्षक – पालक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका. रोहिणी गायकवाड , उपमुख्याध्यापिका. राजाराम गावडे, पर्यवेक्षक दिलीप पाटील , काटेवाडी गावचे पोलीस पाटील सचिन मोरे पाटील ,शेखर जाधव व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक व शिक्षक याच्या मध्ये समतोल साधून कार्य करणार असल्याचे आनंद मोरे यांनी सांगितले.
फोटो ओळ: आनंद मोरे यांचा सत्कार करताना मान्यवर