बारामती: प्रतिनिधी बारामती शहरामधील जळोची येथील तलाठी प्रदीप सदाशिव चोरमले यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड ,पोलीस निरीक्षक संतोष घोळवे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल ,बारामती नगर परिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे व सोशल सर्विस सेंटर चे अध्यक्ष साहिल कोठारी ,सचिव शेखर कोठारी व डॉ.उज्जवला कोठारी व
इतर मान्यवर उपस्तीत होते.
महसूल विभागामार्फत दरवर्षी १मे महाराष्ट्र व कामगार दिना निमित्त सदर पुरस्कार जाहीर करण्यात येतात व स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरस्कार देण्यात येतात.
प्रदीप चोरमले तलाठी म्हणून काम करताना शासनाच्या विविध योजना तळा गाळा प्पर्यंत पोहोचवण्यासाठी जलद गतीने काम करणे,विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना विविध दाखले किंवा माहिती देण्यासाठी तत्पर उपलब्ध असणे व कोरोनाच्या काळात सुद्धा नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे निवडणूक कामे, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध
महसूल विभागातील शासनाच्या नियमांची माहिती देणे आदी उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात आला त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात ही सन २०१२ पासून नाशिक जिल्ह्यातून केली २०२८ मध्ये ते बारामती येथे रुजू झाले त्यानंतर कमी काळात ते त्यांच्या कामामुळे परिचयाचे झाले आता त्यांची नुकतीच बदली ही मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथे झाली
सदर पुरस्काराने जबाबदारी वाढली असून जोमाने काम करणार असल्याचे प्रदीप चोरमले यांनी सांगितले.
फोटो ओळ:
प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रदीप चोरमले