फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) : –
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि.२१ जून २०२४ रोजी श्री. सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मतिमंद मुलाचे निवासी पुनर्वसन केंद्र गोजूबावी बारामती मधील सर्व विद्यार्थ्यांनी योगासनामध्ये सहभाग घेतला, योगासनामुळे शारीरिक मानसिक त्याचबरोबर शरीर आणि मन निरोगी राहू शकते, योगामुळे मोठमोठ्या आजारावर मात करू शकतो दररोज योगा केल्यामुळे शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते, आजच्या योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून वज्रासन, भुजंगासन, त्रिकोणासन, शशकासन, ध्यान, भ्रमरी, प्राणायाम, मकरासन,उष्ट्रासन, दंडासन,वृक्षासन इत्यादी योगासने विद्यार्थ्यांनी केली, विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष राहुल जाधव व व्यवस्थापिका सौ . रुपाली जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.