बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या वतीने सभासदांचा सत्कार वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीचे च्या वातावरणात संपन्न

सभासदांना भेट वस्तू देताना चेअरमन सुनील धुमाळ व राजेंद्र सोनवणे व इतर संचालक

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
 
बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सेवानिवृत्त सभासद व त्यांच्या पाल्याचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बदल सन्मान करण्यात आला
रविवार दि.०९ जून रोजी बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेचे ४५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या प्रसंगी बारामती नगर परिषद च्या मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मा. गटनेते सचिन सातव व मुख्यधिकारी महेश रोकडे व पतसंस्थेचे चेअरमन सुनील धुमाळ, व्हाईस चेअरमन श्रीमती प्रतिभा सोनवणे, संचालक राजेंद्र सोनवणे, भालचंद्र ढमे, चंद्रकांत सोनवणे, फिरोज आत्तार, दादासाहेब जोगदंड, उमेश लालबिगे, संजय चव्हाण, विजय शितोळे, अजय लालबिगे, दीपक अहिवळे, संचालिका श्रीमती सुवर्णा भापकर ,सचिव अनिल गोंजारी व सभासद, विद्यार्थी, विध्यार्थीनी कर्मचारी उपस्तीत होते.
राज्यात आदर्श अशी बारामती नगरपरिषद पतसंस्था असून सभासदाच्या हितासाठी उत्तम आर्थिक नियोजन करत असल्याचे मा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले .सभासदाच्या मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत राहो अशी अपेक्षा मा. गटनेते सचिन सातव यांनी सांगितले तर सभासदाचे कार्य कौतुकास्पद असून आर्थिक प्रगती बरोबर कौटुंबिक हित जोपासत मुलांना उच्च शैक्षणिक द्या असे मुखधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
 सभासदांना ९% लाभांश जाहीर करून १० लाख 
रुपये पर्यंत कर्ज मर्यादा व व्याजाचा दर ९% वरून ८% करण्यात आल्याची ची घोषणा चेअरमन सुनील धुमाळ यांनी केली. 
नगरपरिषद स्तरावर एवढे मोठे कर्ज देणारी राज्यातील बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्था असल्याचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले
अहवाल वाचन अनिल गोंजारी यांनी केले तर सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!