फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) :-
५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ , गोजुबावी मतिमंद मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र गोजुबावी तसेच स्टील केस कंपनी चाकण यांच्या सौजन्याने वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झालाा या कार्यक्रमास धनंजय जमदार अध्यक्ष बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन बारामती यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिन ५ जून रोजी संस्थेच्या प्रांगणात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले
प्रथम संस्थेचे अध्यक्ष राहुल जाधव व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात धनंजय जामदार , उदयोजक पुरुषोत्तम खोमणे, महादेव गायकवाड, आप्पा जाधव, तसेच स्टील केस कंपनी चाकणच्या एच आर मॅनेजर ‘ प्रीती पाटील , महेश शिंदे सुरज यशवंत आणि महेश कुलकर्णी ग्रामसेवक उंडवडी ,किशोर जाधव उपसरपंच गोजुबावी व डॉ. ऋतुजा जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते खोमणे यांनी संस्थेच्या कार्यासाठी पाच हजार रुपये देणगी दिली तसेच उपसरपंच किशोर जाधव यांनी एक दिवसाचे भोजन साठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष नंदकुमार फुले यांनी केले.व संस्थेचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले