फलटण टुडे वृत्तसेवा :-
इंदापूर तालुक्यातील अंथुरणे येथील श्री छत्रपती हायस्कुल च्या 2002 व 2003 च्या दहावीच्या बॅच चा स्नेह मेळावा शनिवार ०१ जून २०२४ रोजी बारामती मध्ये संपन्न झाला.
या वेळी तत्कालीन वर्गातील सर्व विध्यार्थी ,विद्यार्थ्यांनी उपस्तीत होते. विविध क्षेत्रात यशस्वी झालेले विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी आपली ओळख, व्यवसाय नोकरी ची माहिती दिली व वर्गातील सुखद दुःखद आठवणी ना उजाळा दिला.
कार्यक्रमची सुरुवात माता सरवस्ती चे पूजन करून करण्यात आली व दिवंगत शिक्षक काशिनाथ दराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
विविध फनी गेम्स व विजेत्यांचा सन्मान करण्यात आला . त्याच बरोबर दरवर्षी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले.
तर
शाळे साठी विकास निधी किंवा गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत करण्याचे ठरविण्यात आले .त्याच बरोबर शाळेतील विद्यार्थ्यां साठी मोफत मार्गदर्शन देणार असल्याचे व ठरविण्यात आले.
विविध क्षेत्रात यशस्वी व स्थायिक झालेल्या सर्वांनी शाळेमुळे व कडक शिस्तीचे शिक्षक यांच्यामुळे शिक्षणाची गोडी लागली व उत्कृष्ट शिक्षण मिळाल्याचे सांगितले.
स्वागत अमित लोंढे व सुप्रिया पोदकुले यांनी केले ,भालचंद्र खरात यांनी प्रास्ताविक व आभार ऍड अविनाश झणझणे यांनी मानले.तर सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी मानले.