आचार्य अकॅडमीत 10वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

विध्यार्थी चा सन्मान करताना आचार्य अकॅडमी चे संचालक व मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) :-
दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवारी २ जून रोजी बारामतीत उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक या सोहळ्यास उपस्थित होते.
सीबीएससी, एसएससी बोर्ड, आयसीएससी बोर्डात दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. संस्कार बबन काळे (100%), वृषाली दत्तात्रय कोरे ( १०० टक्के ) सानिका कमलाकर टेकवडे (९९.४० टक्के ), संस्कृती विनायक जमदाडे ( ९८.८० टक्के ), वेदांती नानासाहेब साखरे ( ९८.४० टक्के ), स्वराली निरंजन वेदपाठक ( ९८.२० टक्के ), ओम सचिनकुमार कुंभार ( ९८.२० टक्के ), प्रणव चंद्रकांत डोंगरे ( ९७.६० टक्के ), प्रांजल पांडुरंग जगताप ( ९७.४० टक्के ), ऋतुजा नामदेव भिसे ( ९७.४० टक्के ) या विद्यार्थ्यांसह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. १७२९ आचार्य अॅकॅडमीचे संचालक सुमीत सिनगारे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उच्च ध्येय ठेऊन भविष्यकाळाची वाटचाल करण्याचा सल्ला यावेळी श्री. सिनगारे यांनी विद्यार्थ्यांना दिला.संस्थापक, संचालक प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे तसेच संचालक प्रा. प्रवीण ढवळे आणि संचालक कमलाकर टेकवडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
१७२९ आचार्य अॅकॅडमी ही बारामती, इंदापुर आणि पुणे येथील वाकड, रहाटणी येथे कार्यरत असून प्रामुख्याने नीट, जेईई, एमएचटी- सीईटी आणि एनडीए या डॉक्टर, इंजिनिअर तसेच लष्करात अधिकारी होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देण्याचे काम करते. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत या अॅकॅडमीने विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास संपादन केला आहे. 
काळे सर आणि कोरे सर हे पालक प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा बापु काटकर यांनी केली तर सूत्रसंचालन प्रविण अटोळे आणि मोनाली मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन निलेश बनकर, रोहित महाजन आणि राखी मॅडम यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!