फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०१ ) :-
फलटण येथील सुधीर चिंतामणी अहिवळे ( सर )यांची मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी निवड झाली असून त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अनेक संस्थांवर विविध स्तरावरती अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत तसेच ते याआधी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गोंदवले येथील नवचैतन्य हायस्कूल गोंदवले ता. माण येथे त्यांनी प्राचार्य पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे .
सुधीर अहिवळे सर यांची फलटण येथील दोन नंबर प्राथमिक शाळेपासून सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवासात माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल येथे पूर्ण करून त्यांनी उच्च शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पूर्ण केले. त्यांनी शिक्षण शास्त्रात पदवी घेतल्यानंतर फलटण एज्युकेशन सोसायटीच्या याच संस्थेमध्ये शिक्षणाचं पवित्र कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.
फलटण शहरातील नावाजलेल्या व १५० वर्षाची परंपर असलेल्या व सातार जिल्ह्यातील नामांकीत आणि कोल्हापूर विभागात नावलौकीक असलेल्या व अनेक कवी , शास्त्रज्ञ अशा थोर व्यक्तींनी या विद्यालयात प्राचार्य पदाचे काम केले आहे. अशा मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी त्यांची निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम , तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा माजी प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे तसेच त्यांचे फलटणमधील अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.