फलटण टुडे वृत्तसेवा (दालवडी ) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडीच्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10 वी परीक्षेत घवघवीत यश दालवडी सारख्या ग्रामीण भागात सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल 95.65% लागला आहे
या विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक चव्हाण श्रेयश नामदेव याने 92 टक्के गुण मिळवले द्वितीय क्रमांक गोरे कुलदीप शिवाजी 91.80% गुण मिळवले तर मोहिते सुमित अनिल याने 87.20% गुण मिळवले आहेत.
विद्यालयातील एस एस सी बोर्ड परीक्षेत एकूण 46 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 44 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेडगे सर तसेच वर्गशिक्षक श्री निंबाळकर सर व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , स्कूल कमिटी चेअरमन नितीनशेठ गांधी, प्रशासनाधिकारी श्री निकम सर यांनी यशस्वी विद्यार्थी , विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले .