फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती) :-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व एकविध संघटना पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे १५ एप्रिल ते १० मे या कालावधती आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबीरात कबड्डी बॅडमिंटन, कराटे, व्हॉलीबॉल, झुबा डान्स, लॉन टेनिस, जिम्नॅस्टीक्स, योगा, मल्ल्खांब, क्रिकेट, बॉक्सिंग, हॅन्डबॉल आदी खेळांचे क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.