फलटण टुडे वृत्तसेवा :-
मुधोजी महाविद्यालयाची महिला पैलवान कु. ऋतुजा किशोर (गुड्डू ) पवार हिने महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन फ्री स्टाइल क्रीडा प्रकारात 53 किलो वजन गटात कास्यपदक संपादन केले.
या यशाबद्दलफलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी तिच्या यशाबद्दल पुढील वाटचालीसशुभेच्छा देऊन अभिनंदन केले.