फलटण टुडे (बारामती ): –
स्पेशल ऑलिम्पिक भारत नॅशनल स्विमिंग स्पर्धा मंड्या कर्नाटक येथे १ एप्रिल ते ४ एप्रिल या दरम्यान पार पडल्या. यामध्ये वीर सावरकर जलतरण तलाव ची जलतरणपटू वरदा संतोष कुलकर्णी हिने दैदिप्यमान कामगिरी केली. तिने १०० मी बटरफ्लाय मध्ये प्रथम, १०० मी. फ्री स्टाईल मध्ये दुसरा क्रमांक मिळवला तसेच टीम रीले मध्ये महाराष्ट्र (४ /१००) टीममध्ये ब्राँझ पदक प्राप्त केले आहे. वरदा हिने जानेवारी मध्ये नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत २५ मी वा ५० मी फ्री स्टाईल मध्ये राज्यातून पहिलं येण्याचा पराक्रम केला होता व यातूनच तिची निवड नॅशनल मॅचेस साठी झालेली होती. स्पेशल ऑलिम्पिक भारत स्विमिंग स्पर्धेत विविध राज्यातील अनेक स्पेशल विद्यार्थी जे तांच्या राज्यातून प्रथम आले होते ते सहभागी झाले होते.
वरदा ही बाल कल्याण केंद्र शाळेची विद्यार्थिनी आहे व ती वीर सावरकर जलतरण तलाव येथे प्रशिक्षण घेत आहे. तिने अनेक स्पर्धा मध्ये सहभागी घेऊन आपला ठसा उमटविला आहे.तिची जिद्द , चिकाटी व सातत्य ही तिच्या यशाची गुरूकिल्ली आहे असे मत तिची आई व वडील यांनी व्यक्त केले. तिच्या यशामुळे शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर झाले , तिचा शाळेला अभिमान आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल मोकाशी ,खजिनदार माधुरी मोकाशी व मुख्याध्यापिका अर्चना मुळे यांनी व्यक्त केले. वीर सावरकर जलतरण तलावाचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे सचिन विश्वास शेळके खजिनदार मिलिंद अत्रे व सर्व कार्यकारी मंडळांनी तिचे अभिनंदन केले