**
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण ) :-
43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण(अ जा) विधानसभा मतदार संघा मध्ये मा सचिन ढोले साहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच डॉ अभिजित जाधव तहसीलदार फलटण व एस के कुंभार स्वीप नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनखाली मतदार मध्ये मतदान जनजागृती चे काम सुरु आहे
फलटण शहरातील मतदानची टक्का वाढण्यासाठी शहरातील कचरा घंटागाडी वरती भारत निवडणूक आयोगामार्फत बनवण्यात आलेल्या ऑडिओ क्लिप द्वारे मतदारांमध्ये मतदान जनजागृती बाबत अनोखा उपक्रम सुरु करण्याचे नियोजन केले आहे त्या नुसार फलटण शहरात उद्या दिनांक 4 एप्रिल 2024 पासून ऑडिओ क्लिप द्वारे 14 कचरा घंटागाडीवरती जनजागृती करण्यात येणार आहे
श्री तेजस पाटील, उपमुख्याधिकारी नगर परिषद फलटण, स्वीप पथक प्रमुख शहाजी शिंदे तसेच सचिन जाधव स्वीप सहायक अधिकारी, व स्वीप टीम कक्ष यांच्या वतीने आयोजन केले आहे यामुळे मतदारा मध्ये मतदाना बाबत जनजागृती होण्यास मदत होऊन मतदान टक्का वाढण्यास मदत होईल