3 तासात लोणंद पोलीस स्टेशनचे पोउनि श्री शिवाजी काटे यांनी घेतला अपहरीत मुलाचा शोध, मुलास सुखरुप दिले नातेवाईकांचे ताब्यात


फलटण टुडे वृत्तसेवा ( लोणंद ) :-


लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 134/2024 भादवि. 363 प्रमाणे दिनांक25/3/2024 रोजी दाखल  आहे.
सदर गुन्हयातील अपहरीत मुलगा वय 17 वर्षे 8 महीने 23 दिवस रा. निंबोडी ता.
खंडाळा जि. सातारा यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव पळवुन 
नेलेबाबत त्याचे नातेवाईकांनी फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्हयाचा तपास पोउनि श्री शिवाजी काटे यांचेकडे देण्यात आला आहे.

मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री सुशिल बी. भोसले यांनी पो उ नि श्री शिवाजी काटे यांना तपासाच्या सुचना व मार्गदर्शन दिले. 

त्याप्रमाणे पोउनि श्री शिवाजी काटे यांनी पिडीत अपहरीत मुलगा याची गोपनिय बातमीदार यांचे मदतीने माहीती प्राप्त करुन कोणताही वेळ न घालवता सोबत होमगार्ड अमर सुळ यांना सोबत घेऊन वरीष्ठांचे तोंडी परवानगीने पुणे येथील कात्रज येथुन अपहरीत मुलगा वय 17 वर्षे 8 महीने 23 दिवस रा. निंबोडी ता. खंडाळा जि. सातारा यास ताब्यात घेऊन त्यास पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडे तपास करुन सुखरुप नातेवाईकांचे ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा.आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि श्री शिवाजी काटे व होमगार्ड अमर सुळ यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!