फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
श्रीकृष्णाला दही ,लोणी आवडते त्याच श्रीकृष्णाच्या नावावरून व आवडीवरून द्वारकाधीश लस्सी गुणवत्ता आणि दर्जा देत आणि ग्राहकांना अत्यल्प दरामध्ये उपलब्ध होत असल्याने उन्हाळ्यात सुद्धा ग्राहकांना शारीरिक व आर्थिक थंडावा भेटत आहे व श्रीकृष्णाचे नामस्मरण होत असल्याने बारामतीमध्ये द्वारकाधीश लस्सीची चर्चा सर्वत्र जोरदार आहे.
मूळचे दहीगाव येथील ( कोरेगाव तालुका सातारा जिल्हा) हनुमंत परशुराम चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ योगिता हनुमंत चव्हाण कृष्ण भक्त आहेत
नौकरी च्या शोधात आई वडिलां समवेत बारामती एमआयडीसी मधील एका टेक्सटाईल मध्ये कामास आले ,काही कारणास्तव कंपनी बंद झाल्यावर उदरनिर्वाह साठी दहिगाव ला श्रीकृष्णाचया नावावरून व आजी द्वारका यांच्या नावावरून द्वारकाधीश नावाने दुग्ध व्यवसाय सुरू केला,दूध, दही, लस्सी ,तूप इतर पदार्थ तयार करून विक्री करू लागले बारामती चे कनेक्शन असल्याने बारामती भीगवण रोड वर ना नफा ना तोटा या तत्वावर द्वारकाधीश लस्सी उन्हाळ्यामध्ये सुरू केली गुणवत्ता व दर्जा आणि अत्यल्प किंमत या मुळे अगदी काही दिवसात प्रसिद्ध झाली सर्व सामान्य ग्राहक पासून ते उच्च ग्राहक, विध्यार्थी, तरुण,महिला मोठ्या संख्येने परत परत येत आहेत.
दुष्काळ असल्यानंतर गावाकडे अर्थात दहिगाव आणि उत्तर कोरेगाव परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून पाणी आणि पाण्याचे टँकर मोफत पुरवत असतात त्याच धर्तीवर या द्वारकाधीश दुग्ध व्यवसाय मध्ये सुद्धा जवळपास 20 जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे.या या व्यवसायात त्यांच्या पत्नी योगिता कन्या स्नेहा मुलगा हर्ष त्यांना या कामी मदत करत असतात.
श्रीकृष्णाचे विविध चित्रे व व श्रीकृष्णाचे नामस्मरण ही लस्सीची खास खासियत आहे.
व्यवहारिक बाब म्हणून अत्यल्प पैसा मिळला पाहिजे परंतु ही सर्व कृपा श्रीकृष्णाची आहे म्हणून त्याच्याही नामस्मरण करता करता आपल्या शरीरात लस्सी जावी याच उद्देशाने द्वारकादास लस्सी सुरू केल्याचे संचालक हनुमंत चव्हाण यांनी सांगितले.