फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :
शिवजयंती उत्सव समिती बारामती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त’ मोडी लिपी प्रशिक्षण’ चे आयोजन करण्यात आले आहे हे प्रशिक्षण मोफत आहे.
यास बारामती सह इंदापूर दौंड फलटण पुरंदर आदी परिसरातून युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे.
राजमाता जिजाऊ कार्यालय भिगवण रोड बारामती या ठिकाणी मोडी लिपी प्रशिक्षक ऍड ओंकार चावरे हे १७ मार्च ते २४ मार्च पर्यंत सांयकाळी ६ ते ७ या वेळात प्रशिक्षण देत आहेत
मराठा कालीन इतिहास हा संपूर्ण मोडी लिपी मध्ये आहे या मध्ये सुपा परगणा, मराठा कालीन वतनांचे न्याय निवाडे, न्यायव्यवस्था आदी बाबी समाविष्ट असून शासन दरबारी सुद्धा आजही मोडी लिपीतील रेकॉर्ड उपलब्ध आहे या मुळे विद्यार्थी व युवकांना मोडी लिपीचे वाचणे,बोलणे व लिहणे ज्ञान मिळावे व अचूक प्रशिक्षण मिळावे यासाठी सदर प्रशिक्षण चे निशुल्क (मोफत) आयोजन केले असून यामध्ये जवळपास ५० पेक्षा जास्त विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षक वर्ग व इतर नोकरदार ,व्यसाईक याचा लाभ घेत आहे
सदर प्रशिक्षणाकरिता
शिवजयंती उत्सव समिती बारामती
चे सदस्य
राहुल शेडगे, महेश पवार ,संदीप मोहिते, सागर खलाटे ,हेमंत नवसारे, संभाजी माने, सुनील आण्णा शिंदे, रोहन शेरकर, चेतन काळे , सुदर्शन नीचल कुमार चव्हाण आदींनी परिश्रम घेतले आहे