फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
खराडेवाडी (ता. बारामती) येथील आदेश राजेंद्र खराडे बांधकाम
याची सार्वजनिक विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. १६ डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पदासाठी राज्यातून ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती, यामध्ये आदेश खराडे यांचा राज्यात १४१ वा क्रमांक आला आहे. त्यानुसार खराडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागात (पुणे शहर) सहाय्यक अभियंता पदावर रुजू करुन घेण्यात येणार आहे. आदेशने बारामतीतील माळेगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. यामध्ये सलग दोन वर्षे माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला प्रथम क्रमांक मिळविला.सद्या पदवी चे शिक्षण सुद्धा चालू आहे