श्री समर्थ इंजिनीरिंग रूफ शीट मॅन्युफॅक्चरिंग युनिट चा शुभारंभ
फलटण टुडे (बारामती ) :-
जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर दीपक राजे भोसले व परिवाराने केलेले कार्य कौतुकास्पद असून ग्राहकांची उत्तम सेवा व ग्राहकांना दर्जा आणि गुणवत्ता मिळेल असा विश्वास बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केला.
बारामती एमआयडीसी मधील श्री समर्थ इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा शुभारंभ धनंजय जामदार यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 11 मार्च रोजी संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते.
या याप्रसंगी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे मनोहर गावडे, महादेव गायकवाड, अनंत अवचट, ऍड अंबिरशहा शेख, चंद्रकांत नलावडे विष्णू दाभाडे राजन नायर,हरिभाऊ थोपटे , संभाजी माने हरिश कुंभरकर हरिचंद्र खाडे,विजय झांबरे,हेमंत हेंद्र व इंदापूर तालुका भाजपा अध्यक्ष तानाजी थोरात, उद्योजक अरविंद भोसले आदी मान्यवर उपस्तीत होते
एकाच छताखाली ग्राहकांना रुफ पत्रा क्षेत्रातील सर्व पत्रे योग्य साइज व सर्व प्रकारात मिळावेत म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या मशिनरीचा वापर करून ग्राहकांना गुणवत्ता आणि दर्जा देण्यासाठी कटिबद्ध असून मोठ्या शहरातील सर्व पत्रा क्षेत्रातील प्रकार बारामती मिळणार असल्याने वेळ व पैसा ग्राहकांचा वाचणार असल्याची माहिती
श्री समर्थ इंजीनियरिंग रुफ शीट मॅन्युफॅक्चरिंग युनिट चे चेअरमन दीपक राजे भोसले यांनी दिली .
या प्रसंगी उत्तम व उत्कृष्ट कार्य करून ग्राहकांना सेवा व अनेक कामगारांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल दीपक राजे भोसले व सौ उषा ताई राजे भोसले यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले व आभार शहाजी कुंभरकर यांनी मानले.