फलटण टुडे (बारामती ) : -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिशा अकॅडमी मध्ये जेईईमध्ये उत्कृष्ट पर्सेंटाइल मिळवून जेईई ॲडव्हान्स साठी क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांचा सत्कार करण्यात आला.
उदरात असल्यापासून आई आपल्या मुलांची काळजी घेत असते . मूल वाढवत असताना त्याला काय हवे नको, त्याच्या आवडीनिवडी त्याच्या सवयी सगळे काही तिला ठाऊक असते. त्याचप्रमाणे मुलांची जडणघडण त्यांचे यश यामध्ये आईचा वाटा मोठा असतो.
8 मार्च चे औचित्य साधून दिशा अकॅडमी, बारामती येथे यशस्वी विद्यार्थ्यांच्या आईचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ अश्विनी चौधरी ( अथर्व चौधरी 99.51), सौ. प्रितम रणवरे ( यजुवेंद्र रणवरे 99.23),सौ. संगीता अडसूळ,(अथर्व अडसूळ 98.60), सौ.वर्षा साळुंखे (यशराज साळुंखे 98.19), सौ.संध्या सामंत (सृजल सामंत 97.60),सौ.अनिता भरणे(शुभम भरणे 94.51) सौ. पुष्पा देशमुख (चैतन्य देशमुख 90.74),सौ.हसिना मुजावर (अल्तमश मुजावर 90.54) सौ.स्वाति भोसले(सृष्टी भोसले 89.55) सौ.मनिषा बेनगुडे (आकाश बेनगुडे 89.39)या माता पालकांचा सत्कार आणि कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर रायते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशात अकॅडमीचा मोलाचा वाटा असल्याचा उल्लेख केला. यामध्ये अंधत्व असतानाही स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत संसाराचा गाडा चालवणाऱ्या सौ पद्मश्री वरपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पालकांनी, मुलांच्या यशामध्ये प्रा. डॉ. नितीन कदम यांच्या नियोजनाचा वाटा फार मोठा असल्याचा उल्लेख केला. प्रा. सौ. रुपाली कदम यांनी विद्यार्थ्यांना आईने दिलेली संस्काराची शिदोरी सतत सोबत ठेवण्यासाठी, तसेच आईच्या भावना जपण्यासाठीचे मार्गदर्शन केले.