रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा महत्त्वाची : अजित पवार

        स्वयंभू हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ संपन्न
   

स्वयंभू हॉस्पिटलचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री         अजित पवार सोबत डॉअमित भापकर व डॉ रेश्मा                       भापकर व इतर मान्यवर

फलटण टुडे (बारामती ) :-
वाढते औद्योगीकरण व वाढते नागरिकीकरण यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल आणि क्लिनिक ची संख्या वाढत असताना बारामती मधील स्वयंभू हॉस्पिटलने केलेले कार्य कौतुकास्पद असून प्रत्येकाने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती एमआयडीसी मधील डॉ. अमित भापकर व डॉ. रेशमा भापकर यांच्या स्वयंभू हॉस्पिटलचे उद्घाटन गुरुवार 14 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव,राष्ट्रवादी डॉकटर सेल चे अध्यक्ष डॉ सचिन बालगुडे, आय एम ए चे अध्यक्ष डॉ सतिश पवार, मेडिकोज गिल्ड अध्यक्ष डॉ. शेखर शहा, होमोपॅथिक असोसिएशन अध्यक्ष डॉ निलमकुमार शिरकांडे, एन आय एम ए डॉ संजय घुले ,वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वणवे, बांधकाम व्यवसाईक राहुल खाटमोडे,आशिष खत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते.
जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर जिरायत भागातून असून सुद्धा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ अमित गोरख व डॉ रेश्मा भापकर यांनी स्वमालकीच्या जागेत सुरू केलेलि रुग्णसेवा आदर्शवत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
चार हजार स्वेटचे स्क्वेअर फुट चे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून 30 बेड व सर्व अत्याधुनिक सेवा, सुविधा मोठ्या शहरात मिळतात त्या सर्व सुविधा स्वयंभू हॉस्पिटलमध्ये मिळणार असल्याचे डॉ अमित भापकर यांनी सांगितले .
डॉ. रेश्मा भापकर ,यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले व आभार डॉ गोरख भापकर यांनी मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!