फलटण तालुका शरद पवार गटाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते व फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे माजी अध्यक्ष सुभाष तुकाराम शिंदे तथा भाऊ यांचे आज दि. १३ मार्च २०२४ रोजी पुणे येथे वयाच्या ७६ व्या वर्षी खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन .
राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे दुःखद निधन
फलटण टुडे दि. १३ :-
फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतन शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे. ७ मुली, जावई, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव उद्या गुरुवार दि १४ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत जिद्द बंगला फलटण येथे अंतिम दर्शनासाठी ठेवणार असून त्यांचेवर मुळ गावी शिंदेवाडी तालुका फलटण येथे सकाळी ११ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.