फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :-
जागतिक महिला दिना निमीत्त जैन सोशल ग्रुप,फलटण मार्फत जैन समाजातील धार्मीक कार्य ,त्यागी सेवा या कार्यात नेहमीच सक्रीय असलेल्या महिलांचा सन्मान चिन्ह,मोत्याची माळ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शहर पोलिस निरीक्षक शहा साहेब याच्यां सुविद्य पत्नी रिना शहा बोलत होत्या. महिला दिना निमित्त सर्वाना शूभेच्छा देऊन जैन सोशल ग्रुपच्या ऊपक्रमा बद्दल शहा यांनी गौरोगदार काढले.
यावेळी विनया वर्धमान शहा,सुनीता विजयकुमार दोशी,पुजा निनाद भुता,संगिता सुरेंद्र दोशी,प्रज्ञा प्रविण शहा याचां सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षां सविता दोशी होत्या.यावेळी जैन सोशल ग्रुपचे सचिव प्रितम शहा,खजिनदार समिर शहा,सह खजिनदार निना कोठारी ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मगेश दोशि,राजेंद्र कोठारी,संगिनि फोरम अध्यक्षां अपर्णा जैन,आदेशचे संपादक विशाल शहा,जैन सोशल ग्रुप संचालक डाँ.मिलिंद दोशी,डाँ..अशोक व्होरा,सचिन शहा,प्रीतम गांधी ,हर्षद गांधी व जैन सोशल ग्रुप सदस्य व श्रावक-श्रावीका ऊपस्थित होते.पुजा भुता यांनी महिला दिना निमित्त मनोगत व्याक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन दिशा शहा यांनी केले.आभार प्रदर्शन सचिव प्रितम शहा यांनी केले.