विज्ञान प्रदर्शनाची पहाणी करताना रमणशेठ दोशी, अरविंद निकम ,वसुंधरा नाईक निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :-
शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध कलाकुसरींचे,कलादालन तसेच बाल वैज्ञानिकांची झलक दाखविणारे विज्ञान प्रदर्शन व माता पालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन मा.श्री.रमणलाल दोशी (व्हॉइस चेअरमन) फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यावेळी मा.सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर चेअरमन (मु.प्रा.वि.शाळा समिती) श्रीमती निर्मला रणवरे (निमंत्रित सदस्या मु. प्रा.वि.फलटण),मा.श्री. अरविंद निकम(प्रशासन अधिकारी फ.ए.सो.) यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आकर्षक अशा विविध कलाकृतींचे व प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सर्व प्रमुख पाहुण्यांसमोर व आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसमोर व त्यांच्या समवेत आलेल्या पालकांसमोर केले.
यानंतर उपस्थित सर्व महिला समवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय आकर्षक अशा पद्धतीने पार पडला त्यामध्ये प्रशालेतील सर्व शिक्षिकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माननीय चेअरमन मॅडम व प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.रुपेश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सहभागी होऊन माता पालकांचे आगत स्वागत केले व महिला दिनाच्या प्रत्येकास शुभेच्छा दिल्या.