फलटण टुडे बारामती: _
शनिवार दि.09 मार्च रोजी सावंतवाडी गोजुबावी येथील शेतकरी
गोरख आनंदराव सावंत यांच्या शेतावर व मिलिंद वाल्मिक सावंत, यांच्या देशी / गावरानी बियांच्या बीज बँकेला फ्रान्सच्या शेतकरी गटांनी भेट देऊन माहिती घेतली.
फ्रान्स वरून शेतकरी आंतरराष्ट्रीय संवाद या जागतिक संस्थेचे ११ शेतकरी व एम.आर.ए
या संस्थेचे शेतकरी टीम शिवार फेरी केली व पद्मश्री डॉ सुभाष पाळेक कृषी (SPK) तंत्र व या नैसर्गीक शेती पद्धती मधे भारतीय देशी गाईचे महत्व या विषयी सखोल माहिती घेतली व पुढे फ्रान्स मध्ये जाऊन या SPK शेती पद्धतीचे प्रयोग करणार आहेत
व त्या नंतर समींद्राताई देशी गावरानी बीज बँकेची पाहणी करुन विविध प्रकारच्या भाजीपाला बियांची माहिती घेतली. त्यांना श्री प्रसाद घोंगडे यांनी शेती विषयी इंग्लीश मधून संवाद साधुन संपुर्ण माहिती दिली.