फलटण टुडे (बारामती ): –
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात बारामती तालुक्यातील काटेवाडी केंद्रातून खाजगी शाळामध्ये ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ या शाळेला प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तरावर निवड करण्यात झाली. आणि तालुकास्तरीय मुळ्यांकानातून शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.
तृतीय पारितोषिक मिळविलेल्या ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल, सावळ शाळेस रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळेने विद्यार्थ्यांमार्फत शाळा सजावट, वृक्षारोपन, संरक्षण भिंत, बोलक्या भिंती, विद्यार्थी मंत्री मंडळ,शालेय पोषण आहार सहभाग, परसबाग, मेरी माटी मेरा देश,शाळेची बचत बँक,नवभारत साक्षरता सहभाग,विद्यार्थी उपस्थिती प्रमाण,वाचन उपक्रम, वक्तृत्व कला स्पर्धा सहभाग,एनसीसी व स्काऊट गाईड च्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी स्पर्धेत सहभाग ,स्वच्छता मॉनिटर, सण-उत्सव साजरे सहभाग, क्रीडा स्पर्धा आयोजन सहभाग,आरोग्य तपासणी शिबिर,आरोग्य विषयक व्याख्यान, किशोर वयीन मुलींचे समुपदेशन,हात धुवा मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता व्याख्यान, स्वयंरोजगार करियर मार्गदर्शन, तंबाखू मुक्त शाळा,प्लास्टिक मुक्त शाळा, शिल्लक पोषण आहारावर प्रक्रिया उपक्रम माजी, विद्यार्थी पालक यांचे नावीन्य पूर्ण उपक्रम सहभाग असे विविध उपक्रमाचे केंद्रस्तरीय समितीमार्फत मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी तपासणी करण्यात आली. मूल्यांकन तक्त्यांनूसार १०० पैकी ९६ गुणदान करुन, “शालेय भौतिक सुविधा चांगल्या आहेत. एकंदरित शाळेचा दर्जा उत्कृष्ट आहे.” असा शेरा देऊन बारामती तालुक्यातील काटेवाडी केंद्रातून ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ या शाळेला प्रथम क्रमांक देऊन तालुकास्तरावर निवड करण्यात आली. यावेळी बारामती पंचायत समितीचे केंद्र प्रमुख खरात साहेब, दिक्षित एम.सी , वावरे एम.एन यांनी शाळा तपासणी करून शिक्षण विभाग, बारामती पंचायत समितीला अहवाल सादर केला.
तालुकास्तरीय मुल्यांकणासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कुचेकर साहेब, केंद्रप्रमुख खरात साहेब आणि त्यांचे पथकातील इतर सहकारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आंनददायी शिक्षण देण्यामध्ये शाळेचे पर्यवेक्षक सुधिर सोनवणे , विभाग प्रमुख गोरख वणवे , मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते यांचे मोलाचे योगदान दिल्याबद्दल संस्थेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष डाॅ.सागर आटोळे, मानसिंग आटोळे, रेश्मा गावडे, पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दिपक बिबे, सी.ई.ओ.संपत जायपत्रे,सोमनाथ आवतडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक करुन पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
.