*
फलटण टुडे ।बारामती दि. 26।: –
सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी आयडियल प्ले अबॅकस प्रा. लि. बेंगलोर म्हैसूर येथे पार पडलेल्या १९ व्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे.
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये फैजान फारुक पठाण – प्रथम क्रमांक,
आर्या नितीन थोरात – द्वितीय क्रमांक,
सानवी अमोल गुळवे- तृतीय क्रमांक,
आयुशी भरत जगताप – पाचवा क्रमांक
प्रेम दादासाहेब देवकाते- पाचवा क्रमांक,
आरीज रियाज मुल्ला – पाचवा क्रमांक यांनी उत्तुंग यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अबॅकस प्रशिक्षिका ज्योती ढाले व कीर्ती रसाळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे , निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप, रिनाज शेख यांनी अभिनंदन केले.