फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि.16): –
शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. अॅण्ड ए बोर्ड) यांचेकडून घेणेत येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अॅण्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापण प्रमाणपत्र (सी.एच.एम) परिक्षा सातारा केंद्रावर दिनांक 24 मे, 25 मे, 26 मे, 2024 रोजी घेण्यात येणार आहे सदर परिक्षेचे परिक्षार्थीकडून Online पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. Online Application व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. परिक्षार्थी साठी Online अर्ज करण्या बाबत सविस्तर सूचना खात्याच्या website www.mahashakar.maharashtra.gov.in www.sahakarayukta.maharashtra.gov.in या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जी.डी.सी. अॅंड ए व सी.एच.एम परिक्षा 2024 साठी https//gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक 25 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दिनांक 29 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलेली आहे.
या परिक्षेस नव्याने बसू इच्छिणा-या परिक्षार्थीना तसेच पुर्वी परिक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थीना बसता येईल. सदर परिक्षेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा नवीन प्रशासकीय इमारत 4 था मजला, एस.टी.स्टँड-सातारा शेजारी हजेरी माळ सातारा येथे संपर्क साधण्यात यावा.