फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
बहुप्रतिक्षित जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जानेवारी सत्रात घेण्यात आलेल्या बी.ई/बी.टेक. शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठीच्या पेपर क्रमांक एकचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत लडकत सायन्स अकॅडमीचा रोहित शिंदे हा विध्यार्थी ९८.०१ पर्सेंटाइल मार्क मिळवत अव्वल आला आहे , त्याने फिजिक्स विषयात ९९.०१ पर्सेंटाईल गुण मिळवले. तर हिमांशु पवार ९५.५९ , श्रद्धा बनकर ८९.०३ पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. केमिस्ट्री विषयात अरुषा पवार ९७.४२ ,अभय भोंग ९५.५७ ,गौरी कालगावकर ८८.५८ 8, राज देवकाते८८.५८ फिजिक्स विषयात प्रणवी जोशी ८८.१३ स्वराली गडकर ८५.३५ करण दरेकर ८५.०१ , मॅथ्स विषयात हिमांशू पवार ९०.१ करण आटोळे ८७.८४ सानिका अभंग ८७.७० प्रतीक बोडके ८७.६९ , प्रवीण काळे ८६.२२ मार्क्स मिळवले आहेत. अकॅडमी मधील १३ विद्यार्थ्यांनी ८० पर्सेंटाइल पेक्षा अधिक मार्क मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार करताना अकॅडेमीचे संचालक नामदेव लडकत यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मुले गुणवतेच्या बाबतीत शहरी भागातील मुलांपेक्षा सरस आहेत फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. संचालक गणेश लडकत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून लडकत सायन्स अकॅडेमी नीट जेईई या परीक्षांसाठी विध्यार्थाना मार्गदर्शन करत आहे, आजतागायत अनेक विद्यार्थी मेडीकल व इंजिनिअरिंग क्षेत्रात चमकले आहेत. इयत्ता 5 वी ते १२ वी विज्ञान, तसेच नीट व जेईई साठी स्वतंत्र इमारत, आय.आय.टी/एन.आय.टी तसेच कोटा (राजस्थान), लातूर, पुणे, हैद्राबाद येथील, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग ,आधुनिक स्मार्ट बोर्ड, वातानुकुलीत वर्ग, मुलां-मुलींसाठी सुरक्षित होस्टेल सुविधा, लोकल विध्यार्थांसाठी बस सुविधा, प्रत्येक आठवड्यात परीक्षा,अभ्यासामध्ये मागे असणाऱ्या मुलांसाठी वैयक्तिक लक्ष व जास्तीचे वर्ग अशा सुविधा अकॅडेमी मध्ये दिल्या जातात. अकॅडेमी मार्फत गरीब होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करून रुपये २ लाख पर्यन्त शिष्यवृत्ती दिली जाते. अल्पावधी मधेच लडकत अकॅडेमीने शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.