राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वीपणे राबवा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. १२.) :-
*शिक्षण, एकात्मीक बाल विकास* *विभाग, पाणी पुरवठा विभाग व ग्राम विकास विभाग इ. विभागांना मोहिम* *यशस्वीपणे राबविण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुचना दिल्या असून जिल्हयातील 1 ते 19 वर्षे* *वयोगटातील बालकांना शाळा अंगणवाडी, येथे जंतनाशक गोळी द्यावी असे नागरीकांना आवाहन केले आहे*
 राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन. डी.डी.) हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्तेतील मुला-मुलीसाठी जंताच्याआजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन.डी.डी.) हा कार्यक्रम वर्षांतून दोनदा घेण्यात येतो. राष्ट्रीय जंतनाशक मोहिम माहे फेब्रुवारी 202४ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1-19 वर्ष वयोगटातील सर्व मुलांमुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.
१३ फेब्रुवारी २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन असून 20 फेब्रुवारी 202४ मॉप अप दिन आहे. लाभार्थी १- ते ६वर्ष वयोगटातील सर्व बालके, १ली ते १२ वीतील (६ से १९ वर्ष वयोगटातील) शाळेत जाणारी सर्व मुले मुली, ६ ते १९ वयोगटातील शाळेत न जाणारी सर्व मुले- मुली आहेत .
सदर मोहिम सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळा, महानगरपालिका शाळा सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कूल, सी.बी.एस.ई. स्कूल, नवोदय विदयालय, सुधार गृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकूल, संस्कार केंद्रे यांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच
सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी (नर्सिंग कॉलेज, आय. टी. आय., पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविद्यालय, डी. एड महाविद्यालय इ.), सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे येथेही राबविण्यात येणार आहे.
सातारा जिल्हयातील सर्व (उपकेंद्रे, प्रा. आ.केंद्रे, ग्रा.रु.उ.जि.रु, जि.रु) आरोग्य संस्थामार्फत तसेच ३१७६ शासकीय / शासकीय अनुदानित शाळा, ४६१ खाजगी शाळा, ७१ तंबशिक्षण महाविदयालये व ४८७७ अंगणवाडी केंद्रामार्फत जिल्हयातील 1 ते 19
वर्षे वयोगटातील ७ लाख १४ हजार बालकांना जंतनाश गोळी दिली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा मा. बा.स. अधिकारी डॉ. सुनील चक्षाण यांनी दिली. 
 डॉ. महेश खलिपे जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांनी सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, एकात्मीक बाल विकास विभागाचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून मोहिमेसाठी आवश्यक ७ लाख २० हजार जंतनाशक गोळ्या जिल्हयास प्राप्त झाल्या आहेत . त्याचे सर्व आरोग्य संस्थेस वितरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती दिली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!