फलटण टुडे (मुंबई, ) :-
मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात आज खो खो स्पर्धा (मुंबई उपनगर) बांद्रा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे १० फेब्रुवारी, पर्यंत चालू राहणार आहेत. आज झालेल्या सामन्यांमध्ये १४ वर्षे मुली, १७ वर्षे मुले व मुली सहभागी होते. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामना मानखुर्द स्टेशन मनपा शाळा विरुध्द विद्या प्रबोधिनी इंग्लिश स्कूल, मुलुंड या संघात झाला. या सामन्यात विद्या प्रबोधिनी संघाने ०८-०५ असा एक डाव व दोन गुणांनी मानखुर्द स्टेशन मनपा शाळेवर मात केली.
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्टस् अकॅडमी विरुध्द नवशक्ती स्पोर्टस अकॅडमी, चेंबूर या दोन संघात् अंतिम लढत झाली. हा सामना शिर्सेकर्स महात्मा गोधी स्पोर्टस अकॅडमीने १०-०२, असा एक डाव ०८ गुणांनी जिंकला. या विजयात दिव्या गायकवाड ४:४० मि. संरक्षण व १ गुण. धानी रोळेकर ०५:५० व २ गुण अशी जबरदस्त कामगिरी केली. नवशक्तीकडून शिल्पा नाचणेने संघाच्या पराभवातहि उल्लेखनीय कामगिरी केली.
१७ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामण्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्टस अकॅडमी विरुष्द आय बी पटेल मनपा शाळा या दोन संघात झाला. या समान्यात शिर्सेकर्स महात्मा कडून खेळताना अजय राठोडने 2, 2.50 मी. संरक्षण करीत आक्रमणात ४ गडी टिपत आपल्या संधास (१०-०७) असा एक डाव ०३ गुणाने विजय मिळवून देण्यास मोलाची कामगिरी केली. पराभूत संघाकडून सलमान झा याने उत्कृष्ठ खेळ केला
.