श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन 14 फेब्रुवारी रोजी

फलटण टुडे 
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर चे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सतीश फरांदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम बुधवारी 14 फेब्रु 2024 रोजी 
दुपारी 4:30 वाजता सांस्कृतिक हॉल.. मालोजीराजे शेती विद्यालय फलटण या ठिकाणी संपन्न होणार आहे .यावेळी प्रशालेचे चेअरमन मा. वसुंधराराजे नाईक निंबाळकर व व्हा.चेअरमन मा.सौ.नूतन शिंदे उपस्थिती असणार आहे.
या समारंभासाठी व विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पालकवर्गाने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिताराणी कुचेकर यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!