प्रजासत्ताक दिना निमित्त बारामती ते गुजरात सायकल रॅली संपन्न

सायकल चालवा पर्यावरण वाचवा व आरोग्य राखा चा संदेश 

बारामती ते गुजरात सायकल रॅली पूर्ण केल्यावर बारामती सायकल क्लबचे सदस्य
फलटण टुडे (बारामती ): – 
 ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बारामती सायकल क्लब च्या वतीने पहिल्यांदाच बारामती ते गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी सायकलिंग रॅली चे आयोजन करण्यात आले होते
 बारामती सायकल क्लबचे सदस्य
निलेश उत्तमराव घोडके,सचिन जोशी 
प्रद्युम्न मिसाळ, कार्तिक निंबाळकर, सौरभ नाकुरे,शंकर माळवे,बी एम भोसले,उमेश पाटोळे या सदस्यांनी भाग घेतला ४ दिवसात जवळपास ६७० किलोमीटर सायकलिंग चा प्रवास पूर्ण केला. भिगवन चौक येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून सदर रॅलीस प्रारंभ करण्यात आला. बारामती शहर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात हा सायकल प्रवास पूर्ण केला व सायकल चालवा व्यायाम बरोबरआरोग्य उत्तम राखा, पर्यावरण वाचवा,आवश्यक त्या ठिकाणी सायकल चालवा व इंधन बचत करा असा संदेश देणारी पत्रके वाटप करत असा सायकल प्रवास करणारा बारामती मधील हा पहिलाच सायकलिंग करणारा ग्रुप ठरला आहे
अशी माहिती क्लबचे अध्यक्ष ॲड, श्रीनिवास वायकर यांनी दिली.
ठीक ठिकाणी विविध सामाजिक संस्था व मंडळांनी व भारतीय जवान यांनी स्वागत केले.
या पूर्वी बारामती सायकल क्लब ने या पूर्वी बारामती ते अष्टविनायक, गणपतीपुळे, पंढरपूर, पुणे अशाही सायकल राहिलीच आयोजन केलं होते पूर्वीच्या रॅली मुळे आत्मविश्वास वाढला त्यामुळे गुजरात रॅली यशस्वी झाली व पर्यावर व आरोग्यसाठी सुद्धा काम करत असल्याबद्दल समाधान मिळत असल्याची माहिती रॅली यशस्वी पूर्ण करणाऱ्या खेळाडूंनी दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!