अत्याधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात महिलांचे कार्य कौतुकास्पद: सुनेत्रा पवार

 

अंगणवाडी सेविका व महिला स्वयंसहाय्यता गट कौशल्य विकास क्षमता बांधणी साठी कार्यशाळा संपन्न

फलटण टुडे (बारामती ): –
वाड्या वस्त्या, दुर्गम व ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे शहरी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून साकारलेली आर्थिक प्रगती व व्यवसायाचे जाळे ज्ञानात भर टाकत असताना अंगणवाडी सेविका व बचत गट समूहातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रतिपादन केले.
पुणे जिल्हा परिषद च्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क बारामती यांच्या संयुक्त विद्यामानाने बारामती तालुका अंगणवाडी सेविका व महिला स्वयंसहाय्यता गट कौशल्य विकास व क्षमता बांधणीसाठी एक दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी सुनेत्रा पवार उपस्तीत महिलांना मार्गदर्शन केले .
या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालिका शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, तहसीलदार गणेश शिंदे,बारामती पंचायत समिती चे गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जराडे ,बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने,महाराष्ट्र उद्योजकता चे प्रकल्प समनव्यक नितीन बेंद्रे, उपजिल्हाधिकारी तथा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अधीक्षक हनुमंत पाटील,टेक्सटाईल पार्क चे व्यवस्थापक अनिल वाघ व विविध बँकाचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचे सदस्य उपस्तीत होते.
महिला आर्थिक सक्षम झाल्याने कुटूंब समृद्ध झाले मुलाचे शिक्षण,करिअर मध्ये कुटूंब प्रमुख पुरुषा प्रमाणे हातभार लावू शकतात हे सिद्ध झाल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले 
बचत गटाच्या माध्यमातून केवळ महिलांची नाही तर कुटूंबाची व देशाची प्रगती होत आहे शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे पुणे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले 
विविध बँकांच्या माध्यमातून व शासनाच्या योजनेतून महिलांना आर्थिक सहकार्य करत असताना महिला यशस्वी उद्योजिका होत आहेत ही समाधानाची बाब आहे अंगणवाडी सेविकेचे सुद्धा उत्कृष्ट कार्य असून 
 महिला सक्षमीकरण साठी विविध कार्याचा आढावा बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी प्रास्ताविक घेतला.
प्रकल्प संचालिका शालिनी कडू व टेक्सटाईल पार्क च्या सहायक व्यवस्थापिका वृषाली सावंत मनोगत व्यक्त केले.
 तालुक्यातील विविध बचत गटांना समुदाय गुंतवणूक,उद्योग व्यवसाय साठी धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. करंजेपुल निबुत येथील महिला बचत गटांनी ‘नवी उमेद’ हे पथनाट्य व अभिनेते रामभाऊ जगताप यांनी प्रबोधनात्मक नाटिका सादर केली .
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले व आभार नंदन जरांडे यांनी मानले .

चौकट:  
अंगणवाडी सेविका व महिला बचत गटाच्या महिला यांची उपस्तिथी लक्षणीय होती रामभाऊ जगताप यांच्या गाण्यावर ठेका धरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!