फलटण टुडे (सांगली, कुपवाड (क्री. प्र.) : –
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरु असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत किशोरी गटात धाराशिव वि सांगली व किशोर गटात सांगली वि ठाणे तर महिला गटात पुणे वि. धाराशिव व पुरुष गटात मुंबई उपनगर वि. पुणे विजेतेपदासाठी लढतील.
कुपवाड येथे सुरु असलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने रंगतदार झाले. किशोरी गटात धाराशिवने कोल्हापूरवर (10-9) 2 मिनिटे 30 सेकंद राखुन एक गुणाने विजय मिळवला. धाराशिवकडून मैथिली पवार (3, 2 मि. संरक्षण व 2 गुण), सिध्दी भोसले (1.40, 2 मि. संरक्षण व 2 गुण), अस्ना शेख (1, 1.20 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला. तर कोल्हापूरकडून अमृता नाईक (1.40, 1 मि. संरक्षण व 2 गुण), चैत्राली वाडेकर (2, 2 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.
किशोरींच्या दुसर्या उपांत्य सामन्यात सांगलीने सोलापूरचा (9-4) एक डाव राखुन 5 गुणांनी पराभव केला. सांगलीच्या वैष्णवी चाफे (2 मि. संरक्षण व 3 गुण), वेदीका तामखेडे (4.20, 1.00 मि.संरक्षण), श्रावणी तामखेडे (2, 4 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. सोलापूरतर्फे स्नेहा लामकाणे (1.30 मि. संरक्षण), आर्या चोरमुले (1 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी खेळात चांगलीच रंगत आणली.
किशोर गटात सांगलीने पुण्याचा (13-12) अर्धा मि. राखून एक गुणाने पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात सांगलीकडून श्री दळवी (2.50 मि. संरक्षण व 1 गुण), संग्राम डोबळे (1.30 मि. संरक्षण व 5 गुण), अनिकेत एडके (1.30 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी अष्टपैलु खेळ केला. पुण्याकडून सम्राट पंधेरे (2.10, 1.10 मि. संरक्षण व 3 गुण), सुयश चव्हाण (1.20, 1.40 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.
किशोरांच्या दुसर्या उपांत्य सामन्यात ठाण्याने सातार्याचा (9-6) 1 डाव 3 गुणांनी पराभव केला. ठाण्याकडून ओमकार सावंत (3, 1.40 मि. संरक्षण व 2 गुण), अमन गुप्ता (3, 2 मि. संरक्षण व 1 गुण), विनायक भोगे (1, 2 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला. सातार्याकडून मयुर जाधव (3 मि. संरक्षण), प्रथमेश कुंभार (1 मि. संरक्षण व 1 गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
महिला गटात पुण्याने सांगलीवर (18-8) 10 गुणांनी मात केली. पुण्याकडून कोमल धारवाडकर (3 मि. संरक्षण), काजल भोर (5 गुण), दिपाली राठोड (3.10 मि. संरक्षण), स्नेहल जाधव (2.20, 1 मि. नाबाद सरंक्षण व 3 गुण) यांनी चांगला कामगिरी केली. सांगलीकडून स्नेहल चव्हाण (1.50 मि., 1.20 मि. संरक्षण व 1 गुण), प्रतिक्षा बिराजदार (1.30 मि. संरक्षण व 1 गुण) यांची लढत अपुरी पडली.
महिलांच्या दुसर्या उपांत्य सामन्यात धाराशिवने कोल्हापूरला (15-10) 5 गुणांनी हरवत अंतिम फेरी गाठली. धाराशिवच्या अश्विनी शिंदे (2.30, 2.10 मि. संरक्षण), जान्हवी पेठे (1.40, 2.00 मि. संरक्षण व 1 गुण), सुहानी धोत्रे (4 गुण), संध्या सुरवसे (1.10, 2.20 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाने विजय सुकर झाला. कोल्हापूरकडून स्वाती पाटील (1.30, 2.10 मि. संरक्षण) हिने चमकदार कामगिरी केली.
पुरूष गटात पहिल्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीवर (13-12) 1 डाव 1 गुणांनी सहज मात केली. या विजयात आदित्य गणपुले (2.30, 2.10 मि. संरक्षण व 4 गुण), सुयश गरगटे (1.20, 1.10 मि. संरक्षण व 1 गुण), शुभम थोरात (1.20, 1.20 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी मोलाची कामगिरी केली. सांगलीकडून सुरज लांडे (1.20 मि. संरक्षण व 4 गुण), प्रणव झाटेकर (1.10 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला.
मुंबई उपनगर विरूध्द ठाणे हा दुसर्या उपांत्य सामना अटीतटीचा झाला. जादा डावापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई उपनगरने (27-26) 1 गुण व 1 मिनिट राखुन विजय मिळवला. मध्यंतराला (9-7) अशी दोन गुणांची आघाडी उपनगरकडे होती. दुसर्या आक्रमणात ठाण्याने उपनगरचे 10 गडी बाद करून सामन्यातील चुरस कायम ठेवली. दोन्ही डावात मिळून समान गुण झाल्याने जादा डाव खेळवण्यात आला. त्यामध्ये ठाण्याने आक्रमणात 9 गुण मिळवले. उपनगरने आठ मिनिटात 10 गुण मिळवून हा विजय मिळवला. उपनगरने निखिल सोडये (1, 2.20 मि. संरक्षण), अनिकेत चेंदवणेकर (1.40, 1.10 मि. संरक्षण व 2 गुण), अनिकेत पोटे (1, 1.50 मि. संरक्षण व 7 गुण) यांच्या उत्कृष्ट खेळामुळे विजयी मिळवला तर ठाण्यातर्फे लक्ष्मण गवस (१.४० मि. संरक्षण व ७ गुण), जितेश म्हसकर (१.४०, १.२०, १ मि. संरक्षण व १ गुण), आकाश तोगरे (१, १ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला.
अंतिम सामने
किशोरी गट – धाराशिव वि. सांगली व किशोर गट – सांगली वि. ठाणे
महिला गट – पुणे वि. धाराशिव व पुरुष – मुंबई उपनगर वि पुणे