फलटण टुडे वृत्तसेवा :-
मुधोजी महाविद्यालयाची खो-खो खेळाडू कु.पूजा फडतरे हिची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघामध्ये निवड झाली. महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा क्रीडा महोत्सव 2024 ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ,लोणारे या ठिकाणी झाल्या.
या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ खो-खो महिला संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.आपल्या महाविद्यालयाची पूजा फडतरे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन श्री.शिवाजीराव घोरपडे,संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले.