माहीम वॉरियर्स ठरला अमरहिंद मंडळाच्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेचा विजेता

माहीम वॉरियर्सने डायनॅमिक खो-खो लीग चषकावर कोरले नाव 

रोहन टेमकर ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू 
फलटण टुडे (मुंबई, ) :-
 (क्री. प्र,) : माहीम वॉरियर्सने अमरहिंद मंडळाच्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेचा विजेता होत अनेकांच्या अंदाजांना सुरुंग लावला. खरतर सुरवातीपासून या स्पर्धेत माहीम वॉरियर्सने विजयाची मुहुर्तामेढ रोवली होती. माहीम वॉरियर्सने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकत एक इतिहास रचला. अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या दादरच्या अमरवाडी मैदानावर, गोखले रोड येथे संपन्न झालेल्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणून ओमकार मिरागळ (माहीम वॉरियर्स), सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून करण गारोळे (परेल रुद्राज) व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. 
   
आज झालेल्या अंतिम सामन्यात माहीम वॉरियर्सने आपली स्पर्धेतील विजयी मालिका कायम ठेवत परेल रुद्राजला २०-१९ (मध्यंतर ९-१०) चुरशीच्या सामन्यात एक गुणाने विजय हासील करत अमरहिंद मंडळाच्या डायनॅमिक खो-खो लीग चषकावर नाव कोरले. पहिल्या डावात परेल रुद्राजने १ गुणाची आघाडी घेतली होती मात्र त्यांना टी आघडी विजयात परिवर्तीत करता आली नाही. मध्यंतरा नंतर चौथ्या टर्न मध्ये माहीम वॉरियर्सने १४-१३ अशी एक गुणाची आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवून ठेवून विजयी जल्लोष केला. या सामन्यात माहीम वॉरियर्सच्या रोहन टेमकर (२.३०, नाबाद २.१० मि. संरक्षण व १ गुण), जनार्दन सावंत (२.१० मि. संरक्षण व १ गुण), ओमकार मिरागळ (६ गुण), आयुष गुरव (१, १.१० मि. संरक्षण) व ओम भरणकर (२ गुण) यांनी तर परेल रुद्राजच्या करण गारोळे (२,१०, १.५० मि. संरक्षण), पियुष घोलम (१.५० मि. संरक्षण व ३ गुण), रोहित परब (६ गुण) व हितेश आग्रे (४ गुण) यांनी केलेली दमदार कामगिरी या सामन्यात प्रेक्षकांना शेवट पर्यंत खिळवून ठेवण्यास कारणीभूत ठरली. 

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात वरळी फिनिशर्सने साखळीतील पराभवाचा वचपा काढत दादर पँथर्सचा १३-३ असा १० गुणांनी पराभव केला.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मंडळाचे विश्वस्त अरुण देशपांडे, विश्वस्त दीपक पडते, प्र. कार्यवाह रवींद्र ढेवळे, कोषाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सहकार्यवाह जतीन टाकळे, स्पर्धा संयोजक निलेश सावंत, क्षितीज वेदक आदी उपस्थित होते. विजेता संघ माहीम वॉरियर्सचे खेळाडू, प्रशिक्षक सुधाकर राऊळ, व्यवस्थापक रमेश नाटेकर व संघ मालक बाळ तोरसकर.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!