फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी )
स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धा ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान नागपूर येथे पार पडल्या. या स्पर्धा intellectual disability असणाऱ्या विशेष विद्यार्थी विविध वयक्तिक व सांघिक क्रिडा स्पर्धा मध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये बारामतीच्या वरदा कुलकर्णी हिने स्विमिंग या प्रकारात पुणे जिल्हाचे प्रतिनिधित्व केले. तिने १६ ते २१ वयोगट मध्ये ५० मीटर व २५ मीटर फ्री स्टाईल मध्ये राज्यात प्रथम येतं गोल्ड मेडल मिळवले. तिच्या या यशामुळे तिने पुणे जिल्ला व बारामती चे नाव पुन्हा राज्य पातळीवर चमकवले. या स्पर्धा मध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण २८ जिल्हे सहभागी झाले होते. तिची निवड राष्ट्रीय पातळी वर होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी झाली आहे. वरदा ही बाल कल्याण केंद्र कसबा बारामती या शाळेची विद्यार्थीनीं आहे. तिने मिळवल्या या यशामुळे शाळेचे अधक्ष डॉ. अनिल मोकाशी खजिनदार डॉ.माधुरी मोकाशी सचिव मुळीक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मुळे क्रिडा शिक्षक श्री.चंना यांनी तिचे कौतुक केले.
वरदा ही आमच्या शाळेची यशस्वी विदयार्थीनी आहे व ती शाळेचे नाव राष्ट्रीय पातळी वर ही चमकवेल
अशी अपेक्षा डॉ मोकाशी यांनी व्यक्त केली.
वरदा हिने आतापर्यंत अनेक स्पर्धा मध्ये यश मिळवले आहे.मागील वर्षी दिव्याग विभाग व समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन या स्पर्धा मध्ये ही ती राज्यात प्रथम आलेली होती. विविध समुद्र जलतरन स्पर्धा मध्ये तिने ०१ किलो मीटर अंतर पार करून पारितोषीक प्राप्त केले आहे. ती वीर सावरकर जलतरण तलाव येथे प्रशिक्षण घेत आहे. जलतरण तलाव चे अध्यक्ष डॉ अशोक तांबे सचिव विश्वास शेळके व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.