राष्ट्रवादी व्यापार व उद्योग सेल वर सातपुते ,जगताप यांची निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र घेताना सातपुते व जगताप

फलटण टुडे (बारामती ): – 

पुणे जिल्हा व्यापार व उद्योग सेल च्या उपाध्यक्ष पदी बारामती एमआयडीसी येथील उद्योजक राजाराम सातपुते व सरचिटणीस पदी प्रवीण जगताप यांची निवड करण्यात आली .
बारामती मध्ये रविवार दि ०४ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यापारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले या प्रसंगी पुणे जिल्हा व्यापार व उद्योग सेल चे अध्यक्ष नितीन गुरव, जिल्हा कार्याध्यक्ष पंकज सावंत,शहर अध्यक्ष वैभव शिंदे व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील, बारामती बँक चेअरमन सचिन सातव व बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार उपस्तीत होते.
बारामती एमआयडीसी येथे व्ही आर बॉयलर सोल्युशनच्या माध्यमातून राजाराम सातपुते हे कार्यरत असून मराठा सेक्युरिटी एजन्सी च्या माध्यमातून प्रवीण जगताप काम करतात. अनेकांना रोजगार निर्मिती व उद्योजक म्हणून उल्लेखनीय कार्य करून सुशिक्षित बेरोजगार यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आलेली आहे.
उद्योजक करू इच्छिणाऱ्यांना व तरुण उद्योजकांना शासनाच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन ,पक्षाच्या आदेशानुसार कार्य करणार असल्याचे राजाराम सातपुते व प्रवीण जगताप यांनी सांगितले.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!