फलटण टुडे (मुंबई ) :- , मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार सुरु असून आज दंड बैठक स्पर्धा ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकर शेठ शाळेत १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व खुल्या गटासाठी पार पडल्या. या स्पर्धेत मुंबई शहरातील एकूण ४८ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत अज्खीज शेख (१४ वर्षाखाली मुले), मादिया शेख (१४ वर्षाखाली मुली), विवेक सहानी (१७ वर्षाखाली मुले), पायल परमार (१७ वर्षाखाली मुली) व आकाश कोरवे (खुला गट) यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.
या स्पर्धेला शालेय खेळाडूंनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील खालील खेळाडू मुंबई शहर व मुंबई उपनगर संघातील एकत्रित स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. एकूण सहा केंद्रावर होत असलेल्या स्पर्धेतून सर्व प्रथम खेळाडू व त्यानंतर इतर खेळाडू संघतानेच्या निकषावर पात्र ठरून अंतिम फेरीत खेळातील.
गट प्रथम द्वितीय तृतीय
१४ वर्षाखाली मुले अज्खीज शेख अपिशान शेख आबिद शेख
१४ वर्षाखाली मुली मादिया शेख मुस्कान गुप्ता
१७ वर्षाखाली मुले विवेक सहानी हासीफ खान आदित्य तिवारी
१७ वर्षाखाली मुली पायल परमार अल्फिया बानो
खुला गट आकाश कोरवे
या स्पर्धेला बृहन मुंबई महानगर पालीकेचे दत्तू लवटे व किरण इंगळे साहेब तर संघटनेचे सुनिता पन्हाळे, क्रीडा भारतीचे प्रथमेश आदी अधिकारी उपस्थित होते.