अमरहिंद मंडळ डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धा वरळी फिनिशर्सची, माहीम वॉरियर्स विजयी घोडदौड

 

रुद्रास व माटुंगा फायटर्सची बरोबरी

ड्रीम रन्समुळे सर्वच सामने चुरपरेलशीचे   

हितेश आग्रे, श्रेयस राऊळ व प्रतिक घाणेकर यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
फलटण टुडे (क्री. प्र,) : –
अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेत आज ड्रीम रन्समुळे आज झालेले तिन्ही सामने अतिशय चुरशीचे व अटीतटीचे झाले. पहिला सामना परेल रुद्रास व माटुंगा फायटर्स यांच्यात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा सामना पाहायला मिळाला. वरळी फिनिशर्सने लालबाग स्पार्टन्सवर रोमांचक सामन्यात एक गुणाने निसटता विजय मिळवला तर माहीम वॉरियर्सने दादर पँथर्सचा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक झालेल्या सामन्यात सुध्दा एक गुणाने पराभव केला. या सामन्यांमध्ये अनुक्रमे हितेश आग्रे (परेल रुद्रास), श्रेयस राऊळ (लालबाग स्पार्टन्स) व प्रतिक घाणेकर (दादर पँथर्स) यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  

आजच्या पहिल्या सामन्यात परेल रुद्रास व माटुंगा फायटर्स हा सामना १७-१७ असा बरोबरीत सुटला. या सामन्यात माटुंगा फायटर्सने मध्यंतराला ९-७ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात परेल रुद्रासने जोरदार मुसंडी मारत हा सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवले. या सामन्यात माटुंगा फायटर्सने ६ ड्रीम रन्स मिळवले तर परेल रुद्रासने ८ ड्रीम रन्स मिळवत माटुंगा फायटर्स विजयी होण्याचे स्वप्न उधळून लावले. शेवटच्या टर्न मध्ये परेल रुद्रासने तब्बल ५ ड्रीम रन्स मिळवून सामना बरोबरीत राखला. या सामन्यात माटुंगा फायटर्सच्या प्रसाद राडीये (२.४० मि. संरक्षण व १ गुण), वरून पाटील (२.२०, १.१५ मि. संरक्षण), शुभम कांबळे (१.४० मि. संरक्षण व २ गुण), गणेश साहू (१.२० मि. संरक्षण व ३ गुण), अक्षय कदम (१.१५ मि. संरक्षण व २ गुण), सुजय मोरे (१.२५ मि. संरक्षण व १ गुण) तर परेल रुद्रासच्या हितेश आग्रे (२.४०, २ मि. संरक्षण व १ गुण), सुरज खाके (२.१० मि. संरक्षण व १ गुण), पियुष घोलम (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), कारण गारोळे (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी केलेल्या कामगिरीने सर्वच प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. या बरोबरीमुळे दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. 
दुसऱ्या सामन्यात वरळी फिनिशर्सने लालबाग स्पार्टन्सवर १९-१८ (मध्यंतर १२-९) असा एका गुणाने रोमांचक सामन्यात निसटता विजय मिळवला. मध्यंतरला वरळी संघाकडे ३ गुणांची आघाडी होती. लालबाग संघातील खेळाडूंनी दुसऱ्या डावातील संरक्षणात ३ ड्रीम रन मिळवत सामन्यात चुरस आणली. पण वरळी संघाने चांगले संरक्षण करत या सामन्यावर वर्चस्व राखले. वरळीच्या वेदांत देसाई (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), अजय मित्रा (१.५० मि. संरक्षण व ४ गुण), शुभम शिंदे (१.१०, २ मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. लालबाग स्पार्टन्सतर्फे हर्ष कामतेकर (१.३० मि. संरक्षण), श्रेयस राऊळ (१.२० मिं., २.४० मि. संरक्षण व ६ गुण), आत्माराम पालव (१, १ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. 

तिसऱ्या सामन्यात माहिम वॉरियर्सने दादर पँथर्सचा (१९-१८) असा १ गुणांनी पराभव केला. पहिल्या डावात दादर पँथर्सला ड्रीम रनचे ३ गुण तर दुसऱ्या डावात ३ गुण मिळाले. तर विजयी माहिम वॉरियर्सने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २ ड्रीम रन मिळवल्यामुळे माहिम वॉरियर्सचा विजय सोपा झाला. माहिम वॉरियर्सतर्फे कुणाल शिंदे (१.०५ मि. संरक्षण व १ गुण), सतीश गुळंबे (१.३०, १.५० मि. संरक्षण व १ गुण), जनार्दन सावंत (२.२५ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. पराभूत दादर पँथर्सतर्फे सिध्दार्थ कोळी (१.३५, १.२० मि. संरक्षण), प्रतिक घाणेकर (१.५० मि. नाबाद व २.४० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!