फलटण टुडे (बारामती ):
१६ वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा रविवार २१ जानेवरी रोजी ठाणे मुंबई या ठिकाणी संपन्न झाली.या मध्ये विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल विद्यानगरी शाळेची इयत्ता ६ वी मधील स्वरूपा सुनील पवार प्रथम क्रमांक व इयत्ता ३ री मधील शिवांश सुनील पवार चौथा क्रमांक मिळवला.
ग्रामीण भागातील व प्रतिस्पर्धका मधून सर्वात कमी वयात यश मिळवणारे भाऊ बहीण म्हणून यांची उल्लेखनीय कामगिरी आहे
२०२४ या राष्ट्रीय स्पर्धे मध्ये देशातील ५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशाच्या विविध भागात परीक्षेच्या फेऱ्या घेण्यात आल्या होत्या अंतिम फेरी ठाणे येथे घेण्यात आली. डॉ काशिनाथ घाणेकर नृत्यालय ठाणे येथे बक्षिस समारंभ संपन्न झाला.
गणित विषयात १०० समीकरणे ३
मिनिटात सोडवून त्यांनी यश मिळवले आहे
अबॅकसच्या शिक्षिका बारामती एज्युकेशन स्मार्ट च्या संचालिका भाग्यश्री जगताप व विद्या प्रतिष्ठान शाळेतील गणिताच्या शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले.
जळोची ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस चे उपाध्यक्ष प्रताप पागळे व दादासाहेब दांगडे, धनंजय जमदाडे आदी नि पवार भाऊ बहिणीचा सन्मान केला